प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा
www.makeanimpact.in/environment/up-govt-finally-bans-plastic-bags-to-protect-the-environment-public-health/
एक प्लास्टिक ची कॅरी बॅग तयार करायला 0.14 सेकंड लागतात, आणि ती नष्ट करायला 14,000 वर्षे. एकदा वापरून फेकलेल्या बॅग वर धूळ, माती बसून जर ती जमिनीखाली दाबली गेली तर वरून पडलेले पाणी हजारो वर्षे ती जमिनीत झिरपू देत नाही आणि तेथील जमीन नापिक होते. तर विचार करा, आपण सगळे दिवसातून किती कॅरी बॅग्स वापरतो, आणि किती पर्यावरणाचे / निसर्गाचे नुकसान करतोय. खरच कॅरी बॅगची आवश्यकता आहे का ? फक्त एक गोष्ट करा, कायम घराबाहेर जाताना आपल्या ऑफिस बॅग/ गाडीच्या डिकीत / खिशात / पर्स मध्ये एक कापडी पिशवी ठेवा आणि बघा आपल्याला कॅरी बॅगची आवश्यकता भासणारच नाही.भारत देश तुमचा सदैव ऋणी राहील.
शब्दांकन: वीरेन्द्रसिंह उत्पात

No comments:
Post a Comment