मैत्र जिवांचे
Xavier's Institute of communication मधील मराठी मास मिडिया शिकताना वर्षभरातील आठवणी आपल्याशी शेयर करताना.
![]() |
चित्रपटात पाहिलेल कॉलेज त्यादिवशी प्रत्यक्षात पहायला मिळालं. जितकं मोठ नाव, तितकीच मोठी भव्य दिव्य वास्तु पाहुन डोळ्यांच अक्षरशः पारणं फिटलं. स्वप्नातही वाटल नव्हत या कॉलेज मध्ये शिक्षण घेण्याची संधी मला मिळेल.
अगदी प्रवेशाच्या पहिल्या दिवसापासूनच मनात धाक-धुक व्हायला लागली की या कॉलेजमधील संस्कृती आपल्याला आत्मसात होईल का? पण पहिल्याच दिवशी मला अश्या काही व्यक्ती भेटल्या की ज्यांच्याशी ओळख होताच क्षणी धाक-धुकीच रूपांतर आपलेपणात झाल.
त्या व्यक्ती माझ्यासोबत शिकणार असल्याच समजताच आपण या कोलेजमधुन खुप काही आठवणी सोबत घेवुन जाणार आहोत याची प्रत्यक्षात जाणीव झाली. पहिली भेट झाली होती सुतापाशी. पहिले कितीतरी दिवस नाव, त्याचा उच्चार आणि अर्थ समजून घेण्यात गेले. नंतर मग काय पूर्ण MCM ला नावाचा अर्थ पाठ झाला ती गोष्ट निराळी. असो. दिसताच क्षणी वाटल की एकदम हुशार, आभ्यासु व्यक्तिमत्व. टॉमबॉय असल्यामुळ सगळ्यांसोबत जरा बिनधास्तच वागत होती. पण तस काही अजिबात नव्हतं. लहान मुलींसारख तीच वागण, बोलणं, प्रत्येक गोष्टीला प्रतिप्रश्न विचारणं ह्या लहान मुलीतल्या सवयी अजूनही तिच्यात होत्या. आणि कुणी काही चिडवल किंवा ओरडल तर मम्मीला नाव सांगण्याची धमकी ती अजूनही देते याच फार हसु येई. पण महाराष्ट्रातल "दिपनगर" जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला काहीच माहीत नाही अशी भुमिका तिची असे. तिचे ते ट्रेन मधील महिला डब्ब्यातील किस्से, जीवन मरणाचे प्रश्न ऐकून ऐकून कंटाळा येई. पण सर्वांना मदत करण्यात, सर्वांची काळजी घेण्यात आणि इतरांच मन कधीही दुखवले जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची ती खुप काळजी घेई. सुतापा, हा तुझा स्वभाव कधीच बदलू नकोस. तु ज्या क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रात नक्कीच काहीतरी मोठी होशिल यात काही शंकाच नाही. तुला तुझ्या भावी जीवनास खुप खुप शुभेच्छा.
मला दुसऱ्या वेळेस अश्विनी, धनश्री, अमृता, अतुल आणि अजितदादा भेटले.
चला ! मला यावर्षी तरी gf मिळेल. हा गोड गैरसमज मी करून घेतला होता. पण तस काही घडल नाही. दरवर्षी प्रमाणे याही वर्षीचा वेलेंटाईन डे कोरडा गेला.
अश्विनी क्लास मधील मॉडर्न दिसणारी, हुशार (चष्मा असल्यामुळे) आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व. आणि तितकच संस्कारी. झोप प्रिय असल्यामुळे आळशी असु शकते अस वाटत होत. पण ते तेवढं खर नव्हत. ती खरच आळशी होती. आयुष्यात तीच ध्येय नक्कीच उच्च होत. आपल्या आई-वडीलांचा आदर्श समोर ठेवुन जीवनात त्यांना आपल्या मुलीचा गर्व वाटावा यासाठी ती मनापासुन प्रयत्न करत आहे. अश्विनी, तु या प्रामाणिक प्रयत्नात यशस्वी झालीस सुद्धा हे तुझ्या लक्षातही आल नाही. तु खुप खंबीर, आणि धेय्याप्रती काम करण्यास जागृत झालीस यात खुप मोठ यश सामावलेल आहे. तुझ्या आई- वडीलांच्या चेहऱ्यावर ते समाधान मी स्वतः पाहिलय.
नकारात्म गोष्टींपासुन दूर नाही राहिलिस तर तुझ्या प्रगतिच्या आड येणारी तुच आहेस हे तुला स्वतःला जाणवेल. आणि तुला तुझ्या प्रगती पासुन कोणीच रोखु शकत नाही. एक सांगु, या वर्षभरात तुझी जेवढी सोबत मला मिळाली तेवढी इतर कोणत्याही मुलीची मिळाली नाही. खाण्यापासुन तर प्रवासापर्यंत, खोपोली पासून तर एलिफंटा पर्यंत आपण सगळे किती खुश होतो हे तू सुद्धा अनुभवलय. तुला तुझ्या भावी आयुष्यास मनापासुन शुभेच्छा...
आणि हो, लिपस्टिक लावायला कधी विसरु नकोस.
अजितदादांना पहिल्यांदा पाहिल तेव्हा वाटल अरे वा, आमचे सर तर मराठी आहेत. शिकण्यात काही प्रॉब्लम येणार नाही. पण नंतर समजल की हे आपले सहआध्यायी आहेत. शांत, हसरा चेहरा, वैचारीक प्रगल्भता, प्रत्येक गोष्टीवर विचारपूर्वक आणि जबाबदारीने विचार मांडण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्यातील अनुभव स्पष्ट दिसत होता. MCM मधे दादांचा आदरपूर्वक धाक सगळ्यांवरच होता. मिलन असेल, किंवा खोपोली ची ट्रिप असेल किंवा काल झालेला मराठी भाषा दिन. नियोजन बद्ध काम, जबाबदारी, पुढाकार आणि काहीतरी वेगळ करण्याची उर्मी आणि ऊर्जा अजुनही त्यांच्यात तितकीच टिकुन आहे याच नवल. आपल्या अर्ध्या आयुष्यातुन पत्रकारीता हा एक नवीन आध्याय सुरु करणं यासाठी दादांना मी मानतो. दादा, तुम्ही आमचे खरच ऊर्जा स्त्रोत ठरलात. तुमच्यासोबत काम करताना तुमची ऊर्जा आम्हाला मिळाली हे खर आहे. तुम्हाला तुमच्या ध्येय्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
धनश्री, समजदार, उत्साही, प्रेमळ, आणि आजारावर कायम मात करून पुन्हा नव्या जोमाने काम करणारी. तुझ्या जिद्दीला सलाम. वसई-विरार चा कठीण प्रवास करून येणं. आणि ते पण सुतापाला सोबत घेवुन. खरच अवघड काम होत. घरच्या, बाहेरच्या, सगळ्या प्रोब्लेमला तोंड देऊन तिने हा कोर्स पूर्ण केला तीच कौतुक करायला हवं. तु आणि तुझा टिफिन कायमच स्मरणात राहील. तुला खुप खुप शुभेच्छा.
१० च्या क्लाससाठी सकाळी ५ वाजता उठणारी, पाणी भरून,घरातील काम आवरून, नवऱ्यासाठी जेवण तयार करून सर्वात लांबुन (गुड़गाव)वरून येणारी अमृता घुमरे-कारेकर. तिच्याशिवाय MCM क्लास म्हणजे लोकल ट्रेन शिवाय मुंबई. शहापुर ते गुड़गाव चा प्रवास, आणि तीची कौटुंबिक जबाबदारी आणि महत्वाच म्हणजे हजेरी फाईलवर करायची सही ही प्रत्येक फॅकल्टीला ती समजून सांगायची. सर्वात आधी आणि वेळेवर assignment देणं. हे तीच कसब. सगळ्या फॅकल्टीची लाडकी अमृता. लवकरच कौटुंबिक जबाबदारीसह एका मोठ्या न्यूज चॅनलला अँकर म्हणुन जबाबदारी पार पाडेल ही अपेक्षा. तुला त्यासाठी शुभेच्छा.
आणखी एक नावाजलेला आणि उभ्या महाराष्ट्रात नावारुपास येणारा अँकर आणि आमचा CR अतुल. MCM चा दुसरा समन्वयक. (पहिल्या आपल्याला माहीत आहेत) बोलण्याची कला. त्या कलेतून सर्व प्रश्न सोडविणे आणि काही प्रश्न निर्माण करणे यासाठी कुप्रसिद्ध. खऱ्या अर्थाने MCM आणि XIC मध्ये समन्वयकाची भूमिका त्याने पार पाडली. वेळोवेळी सगळ्यांना सहकार्य केले. JR सोबतच्या क्लास मधे 'तो मी नव्हेच' अस दाखवणारा 'तो मीच' असल्याचा आम्हाला दिसत असे. मला आणि विरेंद्रला वेळोवेळी मदत करणारा पण हिशोबाला पक्का असणारा अतुल प्रेमाच्या हिशोबात कच्चा ठरला असल्याच इतरांच म्हणन आहे. पण त्याने या काळात वाढविलेले संपर्क त्याच्या आयुष्यात खुप मोलाचे ठरतील यात शंका नाही. अतुल, तुला लवकरच न्यूज १८ लोकमतला अँकर म्हणुन पाहण्याची आतुरता आहे. तुझ्या भावी आयुष्यास खुप शुभेच्छा.
कुणासाठी विरेंद्र, कुणासाठी वीरेन, कुणासाठी उत्पात दादा, आणि आमचे गुरूजी. पहिल्या दिवशी पाहिल्यावर अस वाटल आपल्यासारख गावाकडून आलेलच दिसतय हे पोरगं. काही येत नसेल माझ्यासारख. पण तस नव्हतं. गरूजी SIAC मधे शिकलेले. त्यात पंढरपुरचे. म्हणजे माहिती आणि अनुभवाचा पेटारा. प्रत्येक गोष्टीवर आभ्यासपूर्वक मतं मांडण. आणि परिस्थिति हाताबाहेर चालली असेल तर पट्टी पाडुन आपल्या हातात घेण हे गुरुजींच कसब. गुरूजी तसे "आंबे" पाडण्यात मुरब्बी. येत्या काळात न्यूज पोर्टल चालु करण्याचा त्याचा मानस असला तरी तो सफल होणार नाही. कारण तस झाल तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास वेगळा ठरेल. गुरूजी एक मुत्सद्दी राजकारणी होतील. घरच्या सर्व जबाबदाऱ्या मुंबईतुन पार पाडणे हे फक्त त्यांनाच शक्य होतय. त्यांच्याकडून सगळे खुप काही शिकले असतील त्यातला मी पण. BMC, प्रेस क्लब, यांसारख्या ठिकाणी जाण्याची सवय हा त्यातलाच एक प्रकार. गुरूजी तुमच्या भावी राजकारणाच्या वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा... हे असय....!
राहिलेत फक्त शेवटचे काही दिवसच. या थोड्या दिवसांत आपण कुणाशीही कसल्याच प्रकारचा मतभेद, मनभेद किंवा संशय बाळगु नये. वर्षभरात जे आपल्याला एकमेकांसाठी ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील त्या करुयात. सर्वांशी प्रेमाने, आपुलकिने वागुयात. आणि झेवियर्स ची २०१७-२०१८ ची बॅच आपल्या आणि XIC च्या स्मरणात कायम राहील यासाठी प्रयत्न करुयात.
शेवटी उरतो मी. माझ्याबद्दल मीच काय बोलणार. साधा, सरळ, गरीब, शांत बसणारा मी. तुमच्या सगळ्यांच्या सनिध्यात शिकत आहे. नक्कीच तुमचेही आशिर्वाद माझ्या सोबत असतील. हीच अपेक्षा.
आपलाच अज्ञाधारक- सौरभ खांडगे.
शब्दांकन: सौरभ खांडगे









No comments:
Post a Comment