Search This Blog

Thursday, 22 March 2018

महिलेची जात...


महिलेची जात...

“लग्न” म्हटलं तर दोन जीवांचे “मीलन”. दोन कुटुंबांचे मीलन. अनोळखा मुलगा अनोळख्या मुलीशी आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी एकत्र येतात. एकत्र होत असताना यात स्वभाव, राहणीमान, व्यवहार ,रुढी-परंपरा यांचा समावेश होतो. त्याचं बरोबर अजून एक गोष्ट समावेश होते ती म्हणजे त्या महिलेची “जात”. समाज हा अनेक रुढी-परंपरांनी भरलेला आहे. त्यात “जात” ही येते.
लग्न ठरवताना मुलगा अथवा मुलगी आपल्या जातीतली आहे कि नाही हे पाहून लग्न ठरवतात. पण आता प्रेमविवाह म्हणजेचं लव्ह मॅरेज करताना कोणी या जात-धर्माकडे फारस पाहत नाही. आपल्याला आवडणा-या व्यक्तीशी प्रेम करुन विवाह करतात.यावेळेस काही ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे असल्यास खूप वादही निर्माण होताना दिसून येतात. तर काही ठिकाणी या गोष्टीला सहज स्विकारले जाते. लग्न झाल्यानंतर मुलगी आपल्यातलीचं म्हणजे आपल्या जातीत येणार असं समज ठेवला जातो.
    असचं काहीसं अलाहाबाद येथे झाले आहे.खुल्या प्रवर्गातील सुनिता सिंग यांचा विवाह ‘जाटव’ या अनुसूचित जातीमधील वीर सिंग यांच्या बरोबर झाला.लग्नानंतर जात बदलते या गैरसमजातून सुनिता सिंग या महिलेने १९९१ मध्ये बुलंदशार जिल्हा दंडाधिक-यांमार्फत जात प्रमाणपत्र मिळविले होते. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि जात प्रमाणपत्र यांच्या आधारावर तिने अनुसूचित जातीच्या कोट्यातून शिक्षिकेची नोकरी मिळविली होती. १९९३ मध्ये सुनिता सिंग यांनी पंजाबमधील पठाणकोट येथील केंद्रीय विद्यालयात पोस्ट ग्रॅज्यूएट शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. याच शाळेत शिक्षिका म्हणून काम करताना सुनिता सिंगने आपले एम.एड ही पूर्ण केले.
   प्रवर्गात जन्मलेल्या सुनिता सिंगने अनुसूचित जातीतील व्यक्तीबरोबर लग्न केल्यानंतर आरक्षणाचा फायदा घेत राखीव कोट्यातून २१ वर्षांपूर्वी केंद्रीय शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली, लग्नानंतर महिलेची जात बदलू शकत नसल्याने सुनिता सिंगला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही, अशी तक्रार तिच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील सुनावणी दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनिता सिंगची केंद्रीय विद्यालयातील नियुक्ती रद्द केली होती. त्यानंतर या निर्णयाला सुनिता सिंगने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
              सुनिता सिंगने बेकायदा आरक्षणाचा फायदा घेतल्याने दोन दशकांच्या तिच्या सेवेनंतर तिची चौकशी होऊन  २०१५ मध्ये संबंधित विभागाने तिचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविले. ज्या जातीत आपण जन्माला येतो ती जात  लग्नानंतरही कायम राहते. मागासवर्गीय समाजातील व्यक्तीशी लग्न केल्यानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवून मिळविणे बेकायदेशीर आहे, असे खंडपीठाने म्हटले.

  एकविसाव्या शतकातदेखील जात-धर्माकडे बघण्याचे दृष्टीकोन समाजात अजून तसेच आहे, जे आधी होते. एखाद्याला त्याचा जातीवरुन उचकवणे हे राजकरणात सोयीनुसार वापरले जाते. जात-धर्म यांचा बाबतीत योग्य असे कायदे-नियम अजूनही झाले नाहीत आणि जे आहेत त्याचा पुरेपूर फायदा न घेता त्याच गैरफायदा घेण्याचे प्रमाण हल्ली वाढताना दिसून येत आहेत. शेवटी “जात” नाही ती “जात” कोणती? असचं म्हणता येईल.

शब्दांकन: धनश्री रावणंग

No comments:

Post a Comment

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, प्रयत...