Search This Blog

Thursday, 22 March 2018

रंगेबेरंगी होळी


रंगेबेरंगी होळी


            होळी म्हटले की, डोळ्यांसमोर येतात ते वेगवेगळे रंग. प्रत्येक रंगाचा आपलाच एक अर्थ आहे. त्या रंगात खूप काही सामावले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात रंगाला खूप महत्व आहे. प्रत्येकाला होळी म्हटली कि, त्याच्या लहानपणीची होळी आठवते. लहानपणी किती दंगामस्ती करून होळी खेळली जायची.
     होळी म्हटली कि पुरणपोळी आलीच. पुरणपोळीचे सुद्धा कितीतरी प्रकार आहे. खापरावरची पुरणपोळी , तव्यावरची पुरणपोळी. वेगवेगळ्या प्रकारच्या खमंग पुरणपोळी आहेत.त्याची चव जिभेवर किती वेळ तरी रेंगाळत राहते. लहानपणी भरपूर छोटे मुलं तर पुरणपोळीसाठीच होळीची वाट बघायचे.
     होळीच्या दिवशी होलिका पेटवली जाते. त्यात सगळं राग, द्वेष, मत्सर,काम,क्रोध याना पेटवले जावे हा मुख्य उद्देश. पण आता तर, होळी सणात सुद्धा स्पर्धा सुरु झाली. कोणाची होळी सर्वात उंच . आणि त्यामुळे निसर्गाची ऱ्हास होतोय. हे तर सपशेल विसरूनच जातोय. लाकूड भरपूर प्रमाणात जाळले जाते. जर या ऐवजी सगळं गाव मिळून एकाच होळी पेटवली तर निसर्गाचा नाश तरी होणार नाही. आणि होळी पेटवताना त्यात कपूरच्या वाद्य पेटवल्या तर, फ्लू , चिकुनगुनिया, कावीळ या सारखे आजार तरी नाश होतील. आणि शुद्ध हवा निर्माण होईल.

     तसेच होळीत पुरणपोळीचे नैवद्य दाखवले जाते. नैवद्य दिले जाते म्हणण्यापेक्षा अक्षरशः पुरणपोळ्या जाळल्या जातात. जर याच पुरणपोळ्या कोण्या भुकेल्याच्या पोटात गेल्या तर त्याचा आत्मा तरी तृप्त होईल . त्याला खायला तरी मिळेल.
     दुसऱ्या दिवशी असते धूलिवंदन. असं सांगतात पूर्वी होळीच्या राखेनेच धुळवड खेळली जायची. होळीची राख एकमेकांना लावली जायची. त्यात वैज्ञानिक कारण होते.
     आज रंगांच्या नावाने ऑईलपेंट वापरले जाते. त्यामुळे संपूर्ण शरीर खराब होते. त्वचेचे विकार होतात. आणि कालांतराने त्याचे रूपांतर एका आजाराला सामोरे जावे लागते. होळी खेळावी, अवश्य खेळावी. पण नैसर्गिक तसेच काही जण मजेच्या नावाने सर्रास दारू पितात. आणि तमाशे घालतात. आणि त्याचा इतरांना त्रास होतो. काही जण तर मुद्दाम दुसऱ्यांना त्रास व्हावा याच उद्देशाने पितात.


     होळी सणाचे पावित्र्य आपणच जपले पाहिजे. किंबहुना फक्त होळीचा नव्हे तर आपल्या इतर सणांचे पावित्र्य आपणच जपले पाहिजे. सण हे फॅशन म्हणून नव्हे तर एकमेकांनी एकत्र येऊन प्रेमाने साजरे केले पाहिजे. रंगांचा बेरंग न होऊ देता होळी साजरी करावी.  


शब्दांकन: सुतापा सपकाळे

No comments:

Post a Comment

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, प्रयत...