भय...!
रात्रीचे 2.13 वाजले होते ..मी आपली मोबाईलमध्ये मस्त गेम खेळण्यात मग्न होती..अचानक आई बेडरुम मध्ये धावत आली ..मला वाटल कि आता झोप म्हणून ओरडायला आली असेल ..ती बोलण्या आधीच मी बोले ठेवते मोबाईल..!
पण तिचं बोलण वेगळेच होते.. ती काहीस पुटपुटून "मारतो बघ कसा मुलींना" असं म्हणाली आणि मला हाँलमध्ये हाताने खुणवून बोलावलं..
तिच वागण मला काही कळल नाही म्हणून लागलीच तिचा मागे पळाले..तर ती हाँलच्या खिडकीतून बाहेर काहीतरी डोकावून पाहत होती..
मी हि तिचा बाजूला जाऊन ती काय पाहते हे बघायला गेले..त्यावर आई बोली "आवाज ऐक काय येतो बाहेरुन..?"
मी हि कान टवकारले...."पापा नही पापा नही, मारा मुझे मारा " असे दोन आवाज कानावर ऐकू येत होते..सोबत लहान दोन बाळांच पण रडण्याचं आवाज येत होता..
नेमक काय चालू हे कळत नव्हत म्हणून घाबरुन आईला विचारलं....
तर ती बोली कि मी जेवणाची भांडी घासण्यापासून मला हा आवाज येत होता तो कोणता हे मी नाही लक्ष दिल पण आता या आवाजात वाढ झाली म्हणून मी पाहिल कि हा काय प्रकार आहेते..आणि पाहिलं तर हा आवाज समोरच्या बिल्डींगमधून येत आहे. (अगदी आमचा समोरच्या खिडकीतून दिसणारी समोरच्या बिल्डींगची खिडकी).."
ती हे सांगत असताना मी मात्र एक टक त्या आवाज येणा-य़ा खिडकीकडे पाहत होती..
त्या घरात दोन लहान मुलं(एक मुलगा आणि एक मुलगी)त्यांची मोठी बहिण जी शाळेत जाते..आणि तिचे आई-बाबा असे पाच जण राहतात..दोन दिवसांपूर्वीच ते कुठून तरी परत आले होते...
ते कुठे गेले होते हे कोणाल माहित नव्हत..आणि आज अचानक त्यांचा घरातून येणारा हा आवाज मात्र मनात एक भय निर्माण करुन गेला..
हे भय कोणते...?
शब्दांकन: धनश्री रावणंग

No comments:
Post a Comment