बदलती कुटुंब व्यवस्था कारणीभूत कोण?
कुटुंब अशी एक संकल्पना आहे ज्यात काळानुसार,प्रदेशानुसार,तसेच समाजानुसार अनेक बदल होत असतात.कुटुंब संस्था याच्या मुळाशी विवाह संस्था आहे.माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत प्रत्येकाला निसर्गाने कामवासना बहाल केली आहे. मनुष्याला बुद्धी असल्याने कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आणि त्यात काळानुसार बदल होत गेले.काळाच्या मर्यादेनुसार कुटुंब व्यवस्थेत बदल घडत गेले.या बदलत समाजाने अनेक आक्षेप आणले.बदलीत्या कुटुंब व्यवस्थेचे कारणीभूत तंत्रद्य्नही आहे' कुटुंब व्यवस्थेत विवाह ला मुळाशी मानले जाते. निसर्गाने माणसासारखी प्रणययन कामवासना बहाल केली आहे पण बुद्धीच्या आणि विवेकच्या जोरावर मनुष्य जातीने कुटुंब व्यवस्था जन्माला आणली.फार पूर्वी म्हणजे कृतीयुगी त्रिपुरुषाच्या मनात आले तर कोणाचाही,कोणाबरोबरही,व केव्हाही संभोग होत असे.आई ,बहीण,भाऊ,बाप वैगरे असा कोणताही भेद नव्हता .त्या नन्तर काळाने स्त्री-पुरुष हाताने स्पर्श करून संभोगण्याची इच्छा दर्शविण्याची चाल टोळीतील समाजाला मान्य झाली.त्याने हस्तग्रहण असे नाव देण्यात आले कालांतराने या स्पर्शापासून द्वंद्ववसंस्था म्हणजेच विवाह संस्था निर्माण झाली.या संस्थेत आपली आईबहीण भाऊ काका मामा बाप आहेत हि कल्पना उदयास आली.विशिष्ठ नाती निर्माण झाली.
या सर्व इतिहासाकडे नजर टाकली तर आपल्यला कुटुंब व्यवस्थेत काळानुसार अनेक बदल होताना दिसली.आज आपण जी नाती सहज पाने स्वीकारतो ती नाती या कुटुंब व्यवस्थेतील एक बदलच होय.सुरुवातील सर्व भाव बहिणीचे एकच घर होते .त्या नंतर संख्या भाऊ बहिणीचे एक घर झले त्या नंतर संख्या भाव भावांचे एक घर झाले . त्या नंतर आई,वडील,भाऊ,बहीण यांचा मिळून कुटुंब झाले .आणि आताची चौकोनी कुटुंब असे कुटुंब व्यवस्था बदलत गेली.
या बदलाच्या मागची करणे जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्यला कुटुंब व्यवस्था लक्षात घ्यावी लागेल. कुटुंब व्यवस्था कशासाठी असते? तर सर्व काही सुरळीत चालण्यांसाठी असते .सामाजिक नीती आणि कायद्यची भितीयु या दोन्ही चाकांवर कुठलीही संस्था चालत असते. पण ज्या वेळी संस्थेतील काही घटकांना हि व्यवस्था आपल्यला फलदायी होत नाही असे वाटू लागते तेव्हा हे घटक त्या संस्थे मध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करत असतात.हि घटके या व्यवस्थेला आवाहन देऊन ती व्यवस्था नाकारतात व त्यातून बदल घडतात.
बदल पुढेही घडत राहतील विज्ञान ,स्त्री शिक्षण, मत स्वातंत्र्य वैगरे घटक याला कारणीभूत होत आहेत आणि होणार आहेत.
आजच्या काळात या बदल मुले लेस्बियन गे पद्धती आपल्या हक्कांसाठी लढतात त्याचप्रमाणे कुटुंबपद्धती आता लिविंग रेलशनशिप वर येऊन थांबली आहे .आपल्या पसंदी दार जोडीदार सोबत लग्न न करता एकत्र राहण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. थोडक्यात माणूस जाती आणि समाजच बदलत्या कुटुंब व्यवस्थेची कारणे आहेत.
शब्दांकन: अश्विनी सुतार
शब्दांकन: अश्विनी सुतार

No comments:
Post a Comment