हुंडाविरोधात कायदा करून मासिकतेत बदल नाही...
विवाह सोहळ्यात हुंडा देणे आणि घेणे बंद होण्यासाठी १९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा आणला. हुंडा घेणे व घेणे हा कायद्याने गुन्हा ठरण्यात आला.मात्र, तरी सुद्धा वराकडील मंडळी कडून वधुपित्याकडून सर्रास हुंड्याची आजही मागणी केली जाते. आपल्या मुलीच्या संसारासाठी कर्जबाजारी झालो तरी चालेल पण मुलीचा संसार सुखात जावा या साठी वधुपित्याकडून या मागणीला होकर दिला जातो.
पूर्वी मुलीच्या लग्न साठी मोठ्याप्रमाणात हुंडा देण्याची प्रथा होती. या प्रथेचे आज इतके अवडंबर माजले आहे कि मुलीच्या वडिलाना अनेकदा घर शेती गहाण ठेऊन हुंड्यासाठी पैस्यांचीसोयकरावी;लागते .शेवटी कर्जात बुडून गेलेल्या पित्याला आत्महत्या करण्याशीय कोणताच पर्याय नसतो . वर्तमानपत्रात रोज एकतरी हुंडाबळीची बातमी वाचनात येतेच. या एकविसाव्या शतकातही हुंड्याची प्रथा आपल्या समाजात चालू आहे आणि त्यासाठी आजही रोज विवाहितांचा, लेकीसुनांचा बळी जात आहे. कधी सासरचे तिला पैशासाठी आगीच्या ज्वाळांत ढकलून देतात, विष देऊन तिची हत्या करतात, नदी-विहिरीत ढकलून देतात किंवा मग तिचा इतका मानसिक आणि शारिरीक छळ करतात की ती बिचारी मृत्यूला जवळ करते.
हुंडयामुळे आत्महत्या केलेले हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. राज्यात दररोज अशा किती घटना घडतात, याची गणतीच न केलेली बरी. विदर्भ, मराठवाडयात शेतकरी आत्महत्या करतात, या पाठीमागचे कारणही हेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आज विदर्भ-मराठवाडयात कितीही गरीब कुटुंब असो, किमान दोन ते तीन लाख रुपये हुंडा दिला-घेतला जातोच, अशी परिस्थिती आहे. त्यात जर नवरा मुलगा पश्चिम महाराष्ट्रातला असेल तर त्याचा भाव खूपच जास्त म्हणजे किमान ८-१० लाखांच्या घरात असतो. मुलगी सुखात राहावी, यासाठी प्रसंगी शेती गहाण ठेऊन सावकारांकडून अवाच्या सव्वा टक्केवारीने कर्ज घेतले जाते. पीक गेल्यानंतर कर्ज फेडू, असे गृहीत धरलेले असते. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे पीक पाण्यात तरी जाते किंवा पाण्याविना जळून तरी जाते. परिणामी शेतकरी आत्महत्येसारखा मार्ग पत्करतात. लग्न हे दोन मानाचंगे दोन कुटुंबांचे मिलन आहे पण हुंडा प्रथेने या विवाहसंस्थेचा बाजार केला आहे.सोने, चांदी , गाड्या जेवणावळीच्या अटींवर लग्न ठरू लागले .
नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या अहवालानुसारच महाराष्ट्रात ३५ टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण न झाल्यामुळे न्यायालयात आरोपपत्रच दाखल होत नाही. छळाच्या दाखल झालेल्या एकूण तक्रारी बघितल्या तरी त्यातील दोन टक्के आरोपींनाही शिक्षा होत नसल्याचे आकडेवारी सांगते.हुंडा’ हा स्त्रीयांसाठी जीवघेणा आहे आणि त्यासाठी स्त्रीयांनाच लढा द्यायचा आहे. प्रत्येक मुलीने जर ‘हुंडा न घेणा-या मुलाशीच लग्न करणार’, अशी शपथ घेतली तरच हुंडाबळी संपण्यास मदत होईल. आणि ख-या अर्थाने ‘बेटी बचाव’ उपक्रम साध्य होईल.त्याबरोबरच आजच्या तरूण पिढीने स्वबळावर, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वाभिमानाने स्वतःची प्रगती करण्यावर भर दिला पाहिजे आणि असे करताना हुंडा न घेण्याची शपथ घ्यायला हवी तसेच तरुणींनी हुंडा घेणार्या आणि मागणार्यांना स्वतःच नकार द्यायचे धाडस अंगी निर्माण करायला हवे, तरच समाजाचे हळूहळू का असेना पण सकारात्मक परीवर्तन होईल आणि हुंडाबळीचे प्रमाण कमी होईल.

No comments:
Post a Comment