झेवियर कॉलेज...एक ग्लॅमरस दुनिया.
मुंबईत पोचलो तेव्हा पावासाला धडाक्यात सुरुवात झाली होती. शनिवारची ती रात्र होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी १० वाजता प्रेवश परीक्षा होती.कॉलेजमधे पोचलो तेव्हा पूर्ण कॉलेज अगदी सुनसान होतं. क्लास मधे आलो, परीक्षा दिली आणि परत निघालो. मात्र तिथुन विचारचक्र सुरु झालं. कॉलेज ची बिल्डिंग बघूनच धढकी भरली होती. दोन तीन लोक आजुबाजुला होती ती पण इंग्रजीत बोलनारी. आपला काही इथे निभाव लागणार नाही अस वाटल. आणि आलो तसं परत निघावं हां विचार केला. दोन दिवसांनी फोन आला. "तुम्ही एडमिशन कधी करू शकता" ! तेव्हा खर तर आनंद झाला होता. पण दडपनही आलं होतं. म्हटलं, करून बघायला काय हरकत आहे. आणि झेवियर मधे प्रवेश झाला.
इथे आल्यावर वाटल या कॉलेज ला कुठेतरी पाहिलं आहे. मग आठवल अरेच्चा ! हे तर तेच कॉलेज आहे जे आपण अनेकदा "ती सध्या काय करते" , "जाने तू या जाने ना" या मुव्ही मधे होत. खुप भारी वाटलं तेव्हा. आणि स्वतःवर थोड़ा गर्वहि झाला की आपण या कॉलेजमध प्रवेश मिळवला. भीती कायम होती. कारण आपण जिथुन आलोय ते जग खुप वेगळ आहे. हे जग खूपच वेगळ. इथले फक्त इंग्लिशमधे बोलणारे मूलमुली, त्यांचं राहणिमान, त्यांची स्टाईल बोलन्याची पद्धत सगळच खुप वेगळ होत. अस वाटत होत की कुठल्या तरी चित्रपटाची शूटिंग सुरु आहे आणि एक रोल आपणही करतोय.पण हा रोल नसून खरखुर आयुष्य आपण जगतोय यांची जाणीव होती. आणि कॉलेज लाइफ काय असत, (जस आपण टीव्ही किंवा मूवीज मधे बघतो तसं) हे इथे आल्यावर कळल. आपलं ते जागायच राहून गेल होतं म्हणून आपल्याला हा चान्स मिळाला अस कायम वाटत राहातं.
इथे आल्यावर कळल की हे लोकं पन आपल्यासारखेच आहे. मराठी बोलणारे सुद्धा खुप लोकं आहेत इथे. इथले व्यवस्थापन, सर्व कॉलेज स्टाफ मला आतापर्यंत मिळालेला सर्वात ऊत्तम असा हा स्टाफ होता. एक परिवारच आहे तो माझ्यासाठी. भारत भरातून आलेले अनेक मूल मुलीं इथे भेटले छान मैत्री झाली. आपल्या सारखेच ते सुद्धा अनेक स्वप्न घेऊन या ग्लॅमरस जागेत आले आहेत हे कळलं तेव्हा जास्त आपलेपना जानवला . बेडकाला आपली विहीर म्हणजेच सगळ जग वाटत असतं. पण त्यातून बाहेर आल की जग काय आहे हे कळत, त्याचा विस्तार किती मोठा आहे हे जाणवत. इथल्या मुलांचे विचार , जीवनाकड़े पाहन्याची त्यांची दृष्टी, धडपड करण्याची वृत्ती बघून आपणही काहितरी करू शकतो ही जाणिव इथे येऊन झाली.आपल्या सारखी अनेक मांडळी इथे येऊन गेली आणि आज यशाच्या ऊंच अशा शिखरावर ती उभी आहेत. हे पाहिल की अजुन हुरूप येतो, इथे आल्याच समाधान मिळतं, इथल्या झगमगत्या दुनियेचा एक भाग झाल्याचा खुप आनंद होतो.
शब्दांकन: अतुल चव्हाण


No comments:
Post a Comment